Pages

Friday 12 September 2014

भेट तुझी-माझी


बरेच दिवस झाले मनमोकळ्या गप्पा नाही मारल्या… 
पोटभर जरा बोलू दे … ।
आता तरी तुझी भेट घडू दे… ।।

नजरे समोर माझ्या नेहमी तूच असतेस … 
चल थोडं मुखदर्शन होऊ दे…
आता तरी तुझी भेट घडू दे… ।।

 हास्याने तुझ्या हृदय माझ किलबिलतं .. 
 गालांवर तुझ्या ती गोड खळी परत पडू दे.. । 
 आता तरी तुझी भेट घडू दे… ।।

मी नाही करत विचार मागचा पुढचा .. 
आत्ता तरी तुझी साथ मिळू दे.. । 
 …………आता तरी तुझी-माझी भेट घडू दे .. ।।
                             
                               --- राहुल केशवराव हिवरे 

Friday 17 August 2012

हरवलोय स्वतःत....अगदी खोलवर कुठेतरी...
हरवलोय मीच माझ्यात .... खोलवर कुठेतरी..

हरवलोय
पप्पांच्या  खाल्लेल्या  मारात
नि..मिळालेल्या कानमंत्रात
हरवलोय मीच माझ्यात ...

हरवलोय
शाळेतल्या बाकाडात
नि.. पटांगणातल्या दंग्यात
हरवलोय मीच माझ्यात ...

हरवलोय
कॉलेजातल्या  सवंगड्यात
नि.. कॅंटीनच्या कट्ट्यात
हरवलोय मीच माझ्यात ... खोलवर कुठेतरी..

हरवलोय
गमावल्याच्या शोधात
आणि मूर्ख मी
उद्या  या आजच्या शोधात
परत हरवील मीच माझ्यात....

सावरतोय....
मीच मला 
कारण ...कालची आठवण
हि उद्याची साठवण 
नि..आजच्या आशेचे किरण....
-राहुल हिवरे 

Sunday 17 June 2012

आठवण तुझी

प्रभात येते रोज, पण  तू कुठे दिसत नाही..
ज्ञात असूनही हे, अवगत का गं होत नाही..!!?
मुळात प्रयन्त करूनही...विसरता अजूनही आले नाही..
न आठवण्यासारखे असे आपल्यात काही घडलेच नाही..
- राहुल हिवरे 

Saturday 14 April 2012

वाट बघतेय त्या क्षणाची

 वाट बघतेय त्या क्षणाची..
ओठांवर अलगद स्मित उमटण्याची..


वाट बघतेय त्या क्षणाची..
गप्प राहून सगळं काही बोलण्याची..


वाट बघतेय त्या क्षणाची..
नजरेतनच सगळ काही समजून घेण्याची..


वाट बघतेय त्या क्षणाची..
त्या मखमली स्पर्शाची...


वाट बघतेय त्या क्षणाची..
डोळ्यात डोळे घालून संपूर्ण रात्र काढण्याची..


वाट बघतेय त्या क्षणाची..
वाट बघतेय त्या  कधीही परत न फिरणाऱ्या क्षणांची.........
- राहुल हिवरे 

Monday 2 April 2012

एकदा तरी


आता बस.... या विचारात होतोच 
कि, अंतरमानाने हाक दिली...
नि अधुरी एक कहाणी स्वतः पुटपुटली...

थोड तर मन माझ 
आता भारी भारीस राहतंय..
उमेदीवर पण माझ्या 
ओस पडू पहातंय...

तरीही माझ्या कुठल्याश्या कोपऱ्यात
ठाव घेतोय त्यांच्या चाहुलींचा..
कारण,
हंबरडा फोडून निघालेल्या चित्कारांना 
एकदा तरी ' तो ' जरूर ऐकेलच 


Thursday 2 February 2012

प्रेमअभंग

निघालो कराया कविता प्रेमभंगाची..,
पण नियतीच्या मनात काही वेगळाच..
आणि झाल काही भलतच
जन्मली गाथा प्रेमअभंगाची*...
-राहुल हिवरे 

*अभंग = भक्ती गीत  

Tuesday 31 January 2012

सहज सुचले

सुचता सुचता सुचत गेले....
लिहिता लिहिता वळत गेले,
गुज या मनी दडलेले....
काव्य मार्गी निघाले.
-राहुल हिवरे